दिल्ली पोलिसांची कारवाई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संस्थेसाठी हेरगिरी करणाऱ्या पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका कर्मचाऱ्याला गुरुवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती गोळा करून ती आयएसआयला पुरवण्याचे काम हा कर्मचारी करत होता. त्याला दोन दिवसांत देश सोडून मायदेशी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच्या दोन साथीदारांनाही राजस्थानातून अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील व्हिसा विभागात काम करणाऱ्या मेहमूद अख्तर या कर्मचाऱ्याला गुरुवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. पैशांचे आमिष दाखवत दोघा फितुरांकडून भारतीय लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती गोळा करण्याचे काम अख्तर करत होता. त्याच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून पाळत ठेवण्यात आली होती. अखेरीस गुरुवारी अख्तरला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.चौकशीदरम्यान अख्तर याने आपण आयएसआयसाठी काम करत असल्याची कबुली दिली. पाकिस्तानी लष्कराच्या बलुच रेजिमेंटचा सैनिक असलेल्या अख्तर याने राजस्थानातील सुभाष जहांगीर आणि मौलाना रमझान या दोघांना फितवून त्यांच्याकडून लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती गोळा केली होती. अख्तर रावळपिंडीनजीकच्या काहुटा येथील रहिवासी आहे.  दरम्यान, अख्तर याला अटक केल्यानंतर परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे राजदूत अब्दुल बासित यांना समन्स धाडत अख्तरच्या कारवायांची माहिती त्यांना दिली. तसेच त्याला अवांच्छित व्यक्ती (पर्सोना नॉन ग्रॅटा) घोषित करून येत्या दोन दिवसांत देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. बासित यांनी मात्र भारताचे आरोप फेटाळून लावले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan spy arrested in delhi
First published on: 28-10-2016 at 00:44 IST