नवीन वर्षांत रेल्वेची किमान अंतरासाठी भाडेवाढ करण्याची शिफारस डी. के. मित्तल समितीने केली आहे. पॅसेंजर तसेच उपनगरी सेवेसाठीही भाढेवाढ करावी असे अहवालात म्हटले आहे. उपनगरी गाडय़ांची दर दोन महिन्यांनी प्रतिकिलोमीटर २ पैसै भाडेवाढ करावी असे समितीने सुचवले आहे.
४ डिसेंबरला स्थापन केलेल्या समितीने अहवाल सादर केला असून रेल्वेचा महसूल वाढवण्यासाठी भाडेवाढीची शिफारस केली आहे. तोटय़ातील व अनुदानित रेल्वे भाडे पद्धती मोडीत काढावी व भाडे वाढवावे असे समितीचे म्हणणे आहे. शिफारशीनुसार उपनगरी भाडे कि.मी. मागे २ पैसे दर महिन्याला वाढवण्यात यावे. लांब अंतराच्या मेल व एक्सप्रेस गाडय़ांसाठी भाडेवाढ किती करावी हे मात्र सुचवण्यात आलेले नाही. समितीने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना अहवाल सादर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panel calls for regular hike in rail fares
First published on: 01-01-2015 at 03:04 IST