बंद गाडीत जीव गुदमरून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोवारीका नागर असे या चिमुकलीचं नाव आहे. बुधवारी रात्री राजस्थानच्या कोटामध्ये ही दुर्दैवी घटना घडली.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थानच्या कोटा येथे राहणारे प्रदीप नागर हे बुधवारी ( १५ मे रोजी) पत्नी आणि दोन मुलींसह एका लग्न समारंभासाठी गेले. या ठिकाणी पोहोचताच, त्यांची पत्नी आणि मोठी मुलगी गाडीतून उतरली. त्यानंतर प्रदीप नागर हे गाडी पार्क करण्यासाठी बाजुच्या एका खुल्या जागेत पोहोचले. आपल्या दोन्ही मुली पत्नीबरोबर असल्याचा त्यांचा समज झाला. त्यामुळे त्यांनी गाडी लॉक केली आणि लग्नाच्या ठिकाणी दाखल झाले.

हेही वाचा – “ड्रायव्हरने पँट काढली अन्…”; महिलेने सांगितला उबर टॅक्सीतला धक्कादायक अनुभव…

दुसरीकडे आपली छोटी मुलगी आपल्या पतीबरोबर असल्याचा प्रदीप नागर यांच्या पत्नीचा समज झाला. त्यानंतर जवळपास दोन तास हे दोघेही लग्नात वेगवेगळ्या लोकांना भेटले. मात्र, ज्यावेळी दोघे एकमेकांसमोर आले, तेव्हा त्यांनी छोटी मुलगी कुठे आहे, असा प्रश्न ऐकमेकांना विचारला. मुलगी आपल्याबरोबर नसल्याचे लक्षात येताच त्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, मुलगी दिसून आली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे मुलीला शोधण्यासाठी हे दोघेही गाडीजवळ पोहोचले, त्यावेळी ती चिमुकली त्यांना बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यांनी तत्काळ तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यादरम्यान, या दाम्पत्याने मुलीचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला असून पोलिसांत गुन्हा दाखल न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.