टॅक्सीने प्रवास करताना चालकाने महिला प्रवाशांबरोबर गैरवर्तन केल्याच्या घटना अनेकदा ऐकू येतात. असाच काहीसा प्रकार ऑस्ट्रेलियातील एका महिलेबरोबर घडला आहे. ही महिला उबर टॅक्सीने प्रवास करत असताना चालकाने चक्क तिच्यासमोरच हस्तमैथून केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर उबर कंपनीकडून चालकावर कारवाई करण्यात आली असून त्याचे नाव अॅपमधून कायमस्वरुपी काढण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातील अॅडीलेडमध्ये राहणाऱ्या एका २६ वर्षीय महिलेबरोबर हा प्रकार घडला आहे. ही महिला रात्री कामावरून घरी जायला निघाली होती. त्यासाठी तिने उबर कंपनीच्या अॅपवरून टॅक्सी बूक केली. टॅक्सीत बसल्यानंतर काही वेळातच गाडीचा चालक हस्तमैथून करताना तिला दिसला.

Shocking twist in child abduction case of Chikhli cousin murder 10 years old boy
भयंकर! आधी गळा दाबला, मग पोत्यात कोंबले आणि उकीरड्यात पुरले! आते भावानेच…
Pimpri, Sexual assault, female dog,
पिंपरी : धक्कादायक! श्वान मादीवर लैंगिक अत्याचार
youth waving guns in real, two wheeler, Pimpri Chinchwad police, FIR, arrest
पिंपरी-चिंचवड: हवेत पिस्तूल उंचावून रिल्स बनवणाऱ्यांना बेड्या; स्टंटबाजी करणं पडलं महागात
byju s ready to face bcci bankruptcy claim
‘बीसीसीआय’च्या दिवाळखोरी दाव्याला आव्हान देण्याची ‘बैजूज’ची तयारी
Anand Agro Pro Chicken,
आनंद ॲग्रो प्रो चिकनचा वाद : सर्व दुकाने बंद करण्याची ठाकरे गटाची मागणी, खंडणीसाठी बदनामीची धमकी, कंपनीची तक्रार
mumbai businessmen, cheated for rupees 1 crore
मुंबई: स्वस्त सोन्याची बिस्किटांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
deepfake cyber fraud
ज्येष्ठ नागरिकांनो सावधान! डीपफेकद्वारे सायबर चोरट्यांचा गंडा, फोनवर मुलांचा रडण्याचा आवाज आणि…
Koo App Shut down
Koo App अखेर बंद! देशी ट्विटरची पिवळी चिमणी उडाली!

हेही वाचा – चालत्या बसमधून उतरली महिला अन् पुढे असं काही भयानक घडले की…, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

यासंदर्भात बोलताना ती म्हणाली, “टॅक्सीत बसल्यानंतर काही वेळात चालकाच्या सीटजवळ काहीतरी चुकीचं घडत असल्याचे माझ्या लक्षात आलं. मी डोकावून बघितलं तर टॅक्सीचा चालकाने पॅंट पूर्णपणे खाली केली होती आणि तो हस्तमैथून करत होता. मी त्याला स्पष्टपणे बघू शकत होते. मात्र, माझ्याबरोबर काही चुकीचं घडू नये, म्हणून मी त्याला काहीही बोलले नाही. मी लगेच माझ्या आईला मेसेस करून संपूर्ण प्रकार सांगितला. तसेच माझ्या फोनचे लाईव्ह लोकशनही मी तिला पाठवले.”

पुढे बोलताना तिने सांगितले, “ही घटना घडली, तेव्हा मला भीती वाटत होती. माझ्याबरोबर काहीही चुकीचं घडू शकलं असतं, माझ्यावर बलात्कारदेखील झाला असता. माझं डोकं काम करणं बंद झालं होतं. हृदयाचे ठोकेही वाढले होते. मी पूर्णपणे घाबरली होती. पण सुदैवाने माझ्याबरोबर काहीही चुकीचं घडलं नाही.”

महिलेकडून चालकाविरोधात तक्रार

दरम्यान, टॅक्सीतून उतरताच महिलेने पोलीस स्टेशनमध्ये पोहोचत घडलेला प्रकार सांगितला. तसेच टॅक्सी चालकाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चालकाला अटक केली. मात्र, काही वेळातच त्याला जामीनही मंजूर करण्यात आला.

हेही वाचा – ‘लाल परी एसटी वाचली पाहिजे..’ शाळकरी मुलीचे एसटीवरील प्रेम, फक्त बसेस बघण्यासाठी…; पाहा VIDEO

उबरकडून चालकाविरोधात कारवाई

महत्त्वाचे म्हणजे या घटनेबाबत उबर कंपनीकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली. असा प्रकार आम्ही कधीही खपून घेणार नाही, असे कंपनीकडून सांगण्यात आले. तसेच संबंधित चालकाविरोधात कारवाई करण्यात आली असून उबर कंपनीच्या अॅपवरून त्याचे नाव कायमस्वरुपी काढण्यात आल्याचे कंपनीनीने सांगितले.