मागील पाच दिवसांमध्ये चार वेळा इंधनाची दरवाढ झाली असून पाच दिवसात ३ रुपये २० पैशांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली आहे. याच दरवाढीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने मोदीजी कुठे आहेत अच्छे दिन, असा प्रश्न विचारत केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्यावर निशाणा साधताना लोकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी ‘द कश्मीर फाइल्स’वर अर्थमंत्री चर्चा करतायत यावरुन सरकारचं लक्ष कुठं आहे हे आपल्याला दिसून येतंय असा टोला लगावलाय.

“पाच दिवसांमध्ये ३ रुपये २० पैशांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ झालीय. घरगुती सिलेंडरची ५० रुपयांनी दरवाढ झालीय. कुठे चाललंय मोदी सरकार? कुठे आहेत अच्छे दिन मोदीजी?”, असे प्रश्न राष्ट्रवादीने विचारलेत. २०१४ च्या निवडणुकीमध्ये सबंध देशाला ‘अच्छे दिन’ चे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने खऱ्या अर्थाने देशाच्या नागरिकांवर पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीच्या निमित्ताने फार मोठे आर्थिक संकट आणले आहे असेही महेश तपासे म्हटलं आहे.

narendra modi
राहुल गांधी ‘शाही जादूगार’! गरिबी दूर करण्याच्या आश्वासनावरून पंतप्रधान मोदींची टीका
An account of the work done in 10 years is presented in BJP resolution
‘मोदी की गॅरंटी’चा जाहीरनाम्यात पुनरुच्चार; भाजपच्या ‘संकल्पपत्रा’त १० वर्षांतील कामांचा लेखाजोखा सादर
Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य
uddhav thackeray criticized pm narendra modi
“काश्मीर ते मणिपूरपर्यंत खदखद अन् हिंसाचार, तरीही भारतीय नीरोचे…”; ‘त्या’ दाव्यावरून ठाकरे गटाची पंतप्रधान मोदींवर टीका!

“मोदीसाहेबांच्या राज्यांमध्ये केंद्रसरकार कुठलाच आर्थिक बोजा सहन करायला तयार नाही म्हणून कुठलीही दरवाढ झाली तर ती थेट नागरीकांच्या माथ्यावर मारायची, असेच भाजपा सरकारचे धोरण आहे,” असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

नक्की वाचा >> “अजित पवारांना टाळता येणे मला शक्यच नाही, खरं तर…”; निर्मला सीतारामन यांचं विधान

“अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देशातल्या अर्थसंकल्पावर चर्चा होणे अपेक्षित आहे परंतु चर्चा कशावर होतेय तर ‘कश्मीर फाईल्स’ सारख्या विषयाची,” असं म्हणत तापसे यांनी अर्थमंत्र्यांवर निशाणा साधला.अर्थमंत्री ‘कश्मीर फाइल्स’वर चर्चा करतात तेव्हा, “या सरकारचं लक्ष नेमकं कुठे आहे हे आपल्याला दिसून येते,” असेही महेश तपासे म्हणाले. “महागाईने आठ महिन्यांचा उच्चांक गाठलेला असताना देखील मोदी सरकार कुठल्याच प्रकारे नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील नाही ही वस्तुस्थिती आज जनतेपासून लपलेली नाही,” अशी टीकाही महेश तपासे यांनी केली.

“देशाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना सामान्य लोकांच्या विषयावर चर्चा होणं अपेक्षित आहे. परंतु चर्चा द कश्मीर फाइल्सची चाललीय. अहो, इथे लोकांना पेट्रोल, डिझेल आणि गॅस घेण्यासाठी पैसे नाहीत त्याच्यावर चर्चा करा. सामान्य लोकांचे प्रश्न सुटतील, त्यांच्या खिशात पैसा राहील यावर चर्चा करा. महागाईने उच्चांक गाठलाय त्यावर कसं नियंत्रण मिळवता येईल त्यावर चर्चा करा,” असा खोचक टोला तपासेंनी लगावलाय.