परिया गावातील आसाराम बापूंच्या आश्रमाचा काही भाग सोमवारी आंदोलकांनी जाळून टाकला. लैंगिक शोषणाच्या आरोपावरून गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून आसाराम बापू अटकेत आहेत. सुरुवातील त्यांना जोधपूरमधील पोलीसांनी अटक केली. त्यानंतर सुरतमध्ये त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना गुजरात पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या पार्श्वभूमीवर आसाराम बापूंच्या पूर्वीच्या समर्थकांनी त्यांच्यावर चिडून आश्रमाचा काही भाग जाळल्याचे पोलीसांनी सांगितले.
वलसाडमधील पार्डी तालुक्यातील परिया गावामध्ये हा आश्रम आहे. ज्या लोकांनी या आश्रमासाठी जागा दिली होती. त्यांच्यापैकी काहींनी सोमवारी संध्याकाळी आश्रमाच्या आवारात प्रवेश करून त्याचा काही भाग जाळून टाकला. आंदोलन करणारे सर्वजण आसाराम बापूंचे समर्थक होते. मात्र, त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर चिडलेल्या गावकऱयांनी आसाराम बापूंना विरोध दर्शविण्यासाठी हे कृत्य केल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Oct 2013 रोजी प्रकाशित
गुजरातमध्ये आसाराम बापूंच्या आश्रमाचा काही भाग जाळला
परिया गावातील स्वयंघोषित संत आसाराम बापूंच्या आश्रमाचा काही भाग सोमवारी आंदोलकांनी जाळून टाकला.

First published on: 22-10-2013 at 04:49 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Part of asarams ashram burnt down in gujarat village