भाच्याच्या कृत्यामुळे अडचणीत आलेल्या रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी शुक्रवारी संध्याकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. 
रेल्वे मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यासाठी पश्चिम रेल्वेच महाव्यवस्थापक महेशकुमार यांच्याकडून आपल्या भाच्यामार्फत कोट्यवधीची सौदेबाजी केल्याचा आरोप बन्सल यांच्यावर होता. सीबीआयने बन्सल याचे भाचे विजय सिंगला यांच्यासह सहा जणांना अटक करून सुमारे एक हजार तासांचे दूरध्वनी संभाषण टॅप केले होते. महेशकुमार यांच्याकडून सिंगला यांना ९० लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने पकडले होते. याप्रकरणी सीबीआय तपास सुरू आहे. दरम्यान, सिंगला यांच्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगत बन्सल यांनी त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pawan kumar bansal resigns as railways minister over bribery charges
First published on: 10-05-2013 at 07:18 IST