देशात वाढती धार्मिक, जातीय तेढ लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात एकतेचा मंत्र घेऊन पुढे जाण्याचा दिलेला संदेश तितकासा प्रभावी आणि स्पष्ट नसल्याची टीका आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी सोमवारी येथे केली.
जातीय आणि धार्मिक असहिष्णुतेच्या वातावरणात रेडिओवरील पंतप्रधानांचा शांततेचा संदेश फिका पडला, अशी प्रतिक्रिया गोगोई यांनी दिली. ते म्हणाले, देशात दादरी आणि फरिदाबादसारख्या घटना घडत असताना पंतप्रधानांनी त्यावरील तात्काळ प्रतिक्रिया देणे गरजेचे होते.
संग्रहित लेख, दिनांक 27th Oct 2015 रोजी प्रकाशित
‘पंतप्रधानांचा शांततेचा संदेश प्रभावहीन’
जातीय आणि धार्मिक असहिष्णुतेच्या वातावरणात रेडिओवरील पंतप्रधानांचा शांततेचा संदेश फिका पडला
Written by रत्नाकर पवार
Updated:
First published on: 27-10-2015 at 00:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peace message of pm ineffective