बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध ‘पीपली लाईव्ह’ चित्रपटातील नाथा नावाच्या भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेल्या ओमकार नाथ मानिकपूरी या कलाकारने आज(बुधवार) आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार नाथ यांनी अधिकृतरित्या आम आदमी पक्षात प्रवेश केला असून त्यांना छत्तीसगडमधून लोकसभा उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. अद्यापतरी ओमकार नाथ यांनी आपल्या लोकसभा उमेदवारीबाबत स्पष्ट केलेले नाही.