पीटीआय, शिमला/मनाली
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात सोमवारी एक बस दरीत कोसळली, यात १२ प्रवासी ठार आणि तीन जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, बस शैनशेरहून कुल्लूला जात असताना जंगला गावाजवळील एका वळणावर सकाळी साडेआठला दरीत कोसळली. अपघातग्रस्तांच्या नातलगांनी प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला. अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी तीन तास लागले. ही कारवाई त्वरित झाली असती तर अनेकांचे प्राण वाचले असते, असे त्यांचे म्हणणे होते.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला. पंतप्रधान कार्यालयाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली. जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत दिली जाईल.