त्रिपुरा येथील मुख्यमंत्री विप्लब देव यांच्या महाभारताच्या काळापासून इंटरनेट होते, या मताशी सहमती दर्शवताना उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी आता नवा शोध लावला आहे. सीतेचा जन्म धरणीतून झाला, असे सांगितले जाते. याचाच अर्थ असा की रामायणाच्या काळातही टेस्ट ट्यूब बेबी हा प्रकार अस्तित्वात असावा, असे शर्मा यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिनेश शर्मा यांनी एका कार्यक्रमात संबोधित केले. ते म्हणाले, पत्रकारिता ही महाभारताच्या काळातही असेल. महाभारतात जे युद्ध झाले ते संजयने धृतराष्ट्राला सांगितले. हे प्रकारचे ‘लाईव्ह टेलिकास्ट’च होते. यावरच ते थांबले नाही. त्यांनी टेस्ट ट्यूब बेबी हे तंत्रज्ञान रामायमाच्या काळातही असावे, असा दावा केला. सीतेचा जन्म धरणीतून झाला, असे सांगितले जाते. याचाच अर्थ असा की रामायणाच्या काळातही टेस्ट ट्यूब बेबी हा प्रकार अस्तित्वात असावा, असे मत त्यांनी मांडले.

दरम्यान, भाजपाचे नेते आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी देखील एप्रिलमध्ये एक जावईशोध लावला होता. महाभारत काळापासून इंटरनेट होते असा दावा त्यांनी केला. एवढेच नाही तर महाभारताच्या काळात तांत्रिक सुविधाही उपलब्ध होत्या. संजय हे डोळ्यांनी युद्ध पाहू शकले कारण त्याला इंटरनेट कारणीभूत आहे असे देब यांनी म्हटले आहे. इंटरनेट आणि सॅटेलाइट महाभारत काळापासून होते हेच संजय यांच्या दिव्यदृष्टीमागचे कारण होते असेही देब यांनी म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People say sitaji born from earthen pot which means concept test tube baby existed says up dy cm dinesh sharma
First published on: 01-06-2018 at 14:23 IST