विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय घेत विद्यार्थ्यांना दिलासा दिला होता. हा दिलासा अल्पकाळच टिकला आहे. आरोग्य मंत्रालयाने आखून दिलेल्या कोविड-१९ च्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यापीठं आणि शैक्षणिक संस्थआ अंतिम वर्षांच्या परीक्षा घेऊ शकतात असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. गृहमंत्रालयाने लागू केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना लिहिलेल्या पत्रात गृह मंत्रालयाने आज विद्यापीठे आणि संस्थांना परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे.”केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्याची परवानगी दिल्याने आता केंद्र सरकारने राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गृहमंत्रालयाने लागू केलेल्या पत्रानुसार अंतिम सेमिस्टरची परीक्षा सक्तीची असेल आणि यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही परीक्षा घेण्यात येईल. तसेच आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) चेही पालन केले जाईल. राज्यातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमुळे राज्य सरकारने विद्यापीठातील पदवीच्या अंतिम परीक्षा रद्द केल्या.  आता केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्याची परवानगी दिल्याने आता केंद्र सरकारने राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

ठाकरे सरकारच्या निर्णयाला दणका

दहा दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देत व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या, सेमीस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र आता केंद्र सरकारने या निर्णयामुळे ठाकरे सरकारच्या निर्णयाला दणका दिला आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षांसंदर्भात थेट केंद्रानेच आदेश दिल्याने या परीक्षा आता विद्यापीठांना घ्याव्याच लागणार आहेत.

 

 

 

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Permission from union home ministry for university examinations msr
First published on: 06-07-2020 at 21:34 IST