करोना कर्फ्यूत काही शिथिलता देत, गोवा सरकारने राज्यात लागू केलेला करोना कर्फ्यू आणखी एक आठवडा म्हणजेच १२ जुलैपर्यंत वाढविला आहे. दरम्यान, गोव्यात ५० टक्के क्षमतेनं बार उघडण्यास सराकरने परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे रेस्टॉरंट्स आणि बार मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण करोनामुळे एका महिन्यापेक्षा जास्त काळ रेस्टॉरंट्स, बार बंद ठेवण्यात आले होते.

याशिवाय दुकाने आणि मॉल सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येणार आहे. यापूर्वी दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी होती. सलून आणि इतर मैदानी खेळ संकुल / स्टेडियम देखील उघडण्यास परवानगी आहे. शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल, सभागृह, कॅसिनो, जिम, स्पा, इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बंद राहतील.

देशातल्या मृतांची संख्या घटली, नवबाधितांचा आकडाही ४० हजारांच्या आतच!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशातली गेल्या २४ तासातली करोना रुग्णांची आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने नुकतीच जाहीर केली आहे. हे आकडे दिलासादायक असल्याने देशातली करोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. देशात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तर घटतेच आहे. मात्र नवबाधितांची संख्याही कमी होताना दिसत आहे.

काल दिवसभरात देशात ३९,७९६ नव्या बाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या आता ४ लाख ८२ हजार ७१ वर पोहोचली आहे. तर देशात आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन कोटी ९७ लाख ४३० झाली असून काल दिवसभरात ४२ हजार ३५२ रुग्ण करोनामुक्त झाले.