करोनाने जगात कहर केला आहे. अनेक देशात करोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत तज्ञांनी दिले आहे. या लाटेत लहान मुले सर्वाधिक बाधित होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे लहान मुलांच्या लशीकरणाचा देखील विचार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी Pfizer लशीला मंजूरी मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटनने १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी Pfizer-BioNTech द्वारे बनवलेल्या कोरोना लस वापरण्यास मान्यता दिली आहे. ब्रिटनच्या ड्रग रेग्युलेटरने शुक्रवारी सांगितले की, सखोल आढावा घेतल्यानंतर असे आढळले की Pfizer-BioNTech ची लस १२-१५ वर्षांच्या किशोरवयीन मुलांसाठी सुरक्षित आहे. अमेरिकेने आणि युरोपियन संघानेही फायझरच्या लशीसाठी असेच मूल्यांकन केले होते.

हेही वाचा – Coronavirus: तिसरी लाट ९८ दिवस राहणार, मोठ्या प्रमाणात लसीकरण हा वाचण्याचा एकमेव; SBI चा इशारा

मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीचे प्रमुख जून रेने म्हणाले, “आम्ही १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांमधील क्लिनिकल चाचण्यांविषयीच्या डेटाचे काळजीपूर्वक परीक्षण केले आणि Pfizer-BioNTech सुरक्षित तसेच उपयुक्त असल्याचे आम्हाला आढळले. या व्यतिरिक्त या लसीचे बरेच फायदे आहेत आणि कोणताही धोका नाही.”

भारतामधील करोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेप्रमाणेच अधिक घातक

भारतामधील करोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेप्रमाणेच अधिक घातक असू शकते. तिसऱ्या लाटेचे देशावर गंभीर परिणाम होतील अशी शक्यता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआयने) नुकत्याच जारी केलेल्या आपल्या अहवालामध्ये व्यक्त केलीय. इतर देशांमध्ये तिसऱ्या लाटेत काय घडलं याचा संदर्भ देत भारतामधील यंत्रणांना या अहवालामधून सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. इकोरॅप नावाच्या या अहवालामध्ये करोना कालावधीत अर्थव्यवस्थेने कशी कामगिरी केली यासंदर्भातही भाष्य करण्यात आलं आहे.

एसबीआयच्या या अहावालामध्ये दिलेल्या माहितीनुसार ज्या मोठ्या देशांमध्ये करोनाची दुसरी लाट १०८ दिवसांपर्यंत होती त्या देशांमध्ये तिसरी लाट सरासरी ९८ दिवसांपर्यंत टीकली. तसेच इतर देशांमधील ट्रेण्ड पाहिल्यास तिसऱ्या लाटेमध्ये दुसऱ्या लाटेपेक्षा १.८ पट अधिक रुग्ण आढळून येतील. जागतिक स्तरावर दुसऱ्या लाटेमध्ये पहिल्या लाटेपेक्षा ५.२ पट अधिक रुग्ण आढळून आले होते. भारतामध्ये मात्र पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत ४.२ टक्के अधिक रुग्ण आढळून आलेले. ही सराकरी जागतिक सरासरीपेक्षा कमी होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pfizer vaccine approved for children aged 12 to 15 in the uk srk
First published on: 04-06-2021 at 16:42 IST