नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर २५ टक्के आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’ (जीटीआरआय) या संस्थेने मत व्यक्त केले आहे. या संस्थेने व्हाइट हाऊसच्या कार्यकारी आदेशाचे विश्लेषण केले. त्यानुसार २५ टक्के करभार औषधनिर्माण, ऊर्जा उत्पादने व इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टरच्या विस्तृत श्रेणीसह सूट दिलेल्या उत्पादनांच्या श्रेणींवर लागू होणार नाही.

व्यापार करार नसलेल्या देशांना अधिक करभार

जगभरातील काही देशांनी अद्याप ट्रम्प प्रशासनाशी व्यापार करार केलेला नाही. त्यांना ७ ऑगस्टपासून अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर नवीन कर आकारण्याच्या शक्यतेचा सामना करावा लागणार आहे.