पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रूग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहचले आहेत. त्यांची प्रकृती रात्री उशिरा खालावली. त्यामुळे त्यांना रात्री उशिरा अहमदाबाद येथेली रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे असं सांगण्यात आलं आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भेटीसाठी अहमदाबाद येथे पोहचले आहेत.

हिराबेन यांना श्वास घेताना होतो आहे त्रास

काही दिवसांपूर्वीच हिराबेन यांनी १०० वा वाढदिवस साजरा केला होता. मंगळवारी उशिरा त्यांची प्रकृती बिघडली. त्यानतंर हिराबेन यांना अहमदाबादच्या यू. एन. मेहता रूग्णालयात दाखल करणयात आलं. हिराबेन यांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो आहे. सध्या यू. एन. मेहता रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या रूग्णालयात पोहचले आहेत.

हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला. पंतप्रधान मोदींच्या आईने वयाची शंभरी पूर्ण केली. या पार्श्वभूमीवर आनंद व्यक्त केला होता. “मला अजिबात शंका नाही की माझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडलं आहे किंवा माझ्या व्यक्तीमत्वामधील चांगल्या गोष्टी या माझ्या पालकांकडूनच आल्या आहेत. आज मी इथे दिल्लीमध्ये बसलो असलो तरी अनेक आठवणी जाग्या झाल्या आहेत,” असं मोदी म्हणाले होते.

याच माहिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आईची भेट घेतली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारानिमित्त मोदी गुजरातमध्ये होते तेव्हा त्यांनी आईची भेट घेतली होती. हिराबेन यांनी निवडणुकीसाठी मतदानही केलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधींचं ट्विट –
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की “एका आई आणि मुलामधील प्रेम शाश्वत आणि अमूल्य आहे. मोदीजी या कठीणप्रसंगी माझं प्रेम आणि समर्थन तुमच्यासह आहे. तुमच्या आईची तब्येत लवकर बरी व्हावी अशी मी आशा व्यक्त करतो”. असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.