नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस तब्बल सात वर्षांनी चीनच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये २०२०मध्ये झालेल्या संघर्षानंतर त्यांची ही पहिलीच चीन भेट असेल. या दौऱ्यात पंतप्रधान जपानलाही जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चीनमधील तिआनजिन शहरात ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला शांघाय सहकार्य परिषदेची (एससीओ) बैठक होणार आहे. त्यासाठी २९ तारखेला दोन देशांच्या दौऱ्यावर रवाना, अशी माहिती आहे. पहिल्या टप्प्यात ते जपानला जाणार असून तेथे जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्याबरोबर वार्षिक शिखर परिषदेत द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर ते एससीओच्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला जातील.