भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. काल (२० जून) ते अमेरिकेसाठी रवाना झाले. या भेटीत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासोबत किमान तीन बैठका घेणार आहेत. यामध्ये एक खासगी बैठक तर, एक डिनर असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या स्नेहभोजनालाही जाणार आहेत. तसंच, युएस काँग्रेसच्या नेत्यांकडूनही मोदींचं स्वागत केलं जाणार आहे.

परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी पंतप्रधानांच्या आगामी राज्य दौऱ्याची माहिती देताना सांगितले की, “आमच्या नात्यातील हा एक मैलाचा दगड आहे. ही एक अतिशय महत्त्वाची भेट आहे. २०१४ पासून मोदींनी सहा वेळा अमेरिकेला भेट दिली आहे. या भेटीदरम्यान, सह-उत्पादन, सह-विकास आणि पुरवठा बदल राखण्यासाठी संरक्षण उद्योगांमध्ये जवळून भागीदारी करण्यासाठी दोन्ही बाजू एक रोडमॅपवर काम करत आहेत.

दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. मोदींच्या या भेटीमुळे दूरसंचार, अंतराळ आणि उत्पादन क्षेत्रातील तंत्रज्ञान क्षेत्रात सखोल संबंध निर्माण होणार आहेत. परराष्ट्र सचिव क्वात्रा म्हणाले की, संरक्षण औद्योगिक सहकार्य रोडमॅप हा पंतप्रधान मोदींच्या यूएस दौऱ्याचा एक महत्त्वाचा परिणाम असेल अशी अपेक्षा आहे. भारत आणि अमेरिकेतील संबंधांचा मुख्य स्तंभ म्हणजे संरक्षण सहकार्य आहे, असंही क्वात्रा म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टन डीसीला जातील. तिथे ते राष्ट्राध्यक्ष बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन यांना भेटणार आहेत. २२ जून रोजी मोदींचे व्हाईट हाऊसमध्ये औपचारिक स्वागत केले जाईल, त्यानंतर बिडेन यांच्यासोबत औपचारिक द्विपक्षीय बैठक होईल.राष्ट्राध्यक्ष बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन गुरुवारी संध्याकाळी मोदींच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचेही आयोजन केले आहे.