यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीमधील पहिल्या हिंदू मंदिराचं उद्धाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना झाले आहेत. १४ फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी यांच्याहस्ते अबुधाबीमधील स्वामीनारायण मंदिराचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर येत्या १ मार्च पासून हे मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे. हा मोदींचा पंतप्रधानपदी आल्यानंतरचा सातवा यूएई दौरा असून त्यासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेल्या सविस्तर पोस्टमध्ये मोदींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कसं आहे UAE मधील पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन!

अबुधाबीची राजधानी अबू मुरैखामध्ये हे मंदिर बांधण्यात आलं आहे. या मंदिराला एकूण ७ शिखरं असून ते सात अमिरातींचे प्रतीक असल्याचं मानलं जात आहे. या प्रत्येक शिखरामध्ये हिंदू देव-देवतांच्या कथा, शिकवण चित्र वा प्रतिकृतींच्या माध्यमातून दर्शवण्यात आल्या आहेत. गेल्या ३ वर्षांपासून राजस्थान व गुजरातमधील तब्बल २ हजार कारगीर हे मंदिर बांधण्यासाठी राबले आहेत. हे मंदीर एवढं मोठं आहे की एका वेळी मंदिरात ८ ते १० हजार भाविक दर्शनासाठी येऊ शकतात. या मंदिराच्या उभारणीसाठी २० हजार टन दगड आणि संगमरवर वापरण्यात आला आहे.

wild elephant created havoc in the district gadchiroli three women seriously injured in attack
रानटी हत्तीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू ; दोघी गंभीर
1195 minor girls missing from Nagpur in three years
नागपूर : उपराजधानीतून तीन वर्षांत ११९५ अल्पवयीन मुली बेपत्ता
Ajit Pawar gave a public confession Said Hooliganism in the industrial area
अजित पवारांनी दिली जाहीर कबुली; म्हणाले, ‘औद्योगिक पट्ट्यात गुंडगिरी…’
youth murder
वसई : अपघात नव्हे ही तर हत्या, ३ वर्षांनी हत्येला फुटली वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१५ साली अबू धाबीच्या दोन दिवसीय दोऱ्यावर गेले होते. इंदिरा गांधी यांच्यानंतर ४३ वर्षांनी भारतीय पंतप्रधानाने आखाती देशांला भेट दिली होती. या भेटीदरम्यान मंदिर उभारणीसाठी स्थानिक प्रशासनाने जमीन देण्याच्या निर्णयाची घोषणा केली.

अबू धाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचे मोदींच्या हस्ते लोकार्पण, जाणून घ्या या मंदिराची वैशिष्ट्ये…

नरेंद्र मोदींची सविस्तर पोस्ट

दरम्यान, यंदाच्या दौऱ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सविस्तर पोस्ट केली असून त्यात या दौऱ्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. “या दौऱ्यात मी यूएई आणि कतारला भेट देणार आहे. त्यात अनेक कार्यक्रमांमध्ये मी उपस्थिती लावेन. यामुळे द्वीपक्षीय संबंध वृद्धींगत होतील. मी पंतप्रधान झाल्यापासूनची ही माझी सातवी यूएई भेट आगे. भारत-यूएई यांच्यातील मित्रत्वाच्या संबंधांसाठी भारताच्या बांधीलकीचंच हे प्रतीक आहे”, असं मोदींनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

“या दौऱ्यात मी यूएईमधील पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन करेन. शिवाय अबू धाबीमधील कार्यक्रमात मी तेथील हिंदू समुदायाशी संवाद साधेन. त्यापुढे कतारमध्ये मी शेख तमिम बिन हमाद यांची भेट घेईन. त्यांच्या नेतृत्वाखाली कतार वेगाने विकास करत असल्याचं जगानं पाहिलं आहे”, असंही मोदींनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कतारकडून ८ भारतीय नौसैनिकांची सुटका

दरम्यान, मोदी कतार दौऱ्यावर निघण्याच्या एक दिवस आधीच कतार प्रशासनाने हेरगिरीच्या आरोपांखाली तिथे अटकेत असणाऱ्या ८ भारतीय नौसैनिकांची सुटका करण्याचा निर्णय घेतला. यातील सात नौसैनिक भारतात परतले असून उर्वरीत एक अधिकारीही कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण करून लवकरच भारतात परतणार आहे.