पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारपासून पाच देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. शनिवारी ते नवी दिल्लीतून अफगाणिस्तानसाठी रवाना होतील, असे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या संपूर्ण दौऱ्याची माहिती त्यांनी दिली.
मोदी अफगाणिस्तान, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको या देशांना भेट देणार आहेत. सहा जून रोजी मोदी अमेरिकेमध्ये पोहोचणार असून, सात जूनला ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. त्याचदिवशी संध्याकाळी ते अमेरिकेतील उद्योगपतींचीही भेट घेणार आहेत. ९ जूनला मोदी भारतात परतणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi on five states visit from 4 june
First published on: 03-06-2016 at 17:45 IST