PM Narendra Modi in Sansad : संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सलग दोन दिवस संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संविधानावर चर्चा चालू आहे.  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत हजर राहून या चर्चेत सहभाग घेतला. त्यांनी यावेळी तीन दिग्गजांची महत्त्वाची विधाने सभागृहाला सांगितली. हे तिघेही संविधान सभेचे सदस्य होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाचून दाखवली दिग्गजांची विधाने

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवातीलाच संविधान सभेचे सदस्य असलेले राजश्री पुरुषोत्तमदास टंडन यांच्या एक वाक्य सांगितले. ते म्हणाले, “राजश्री पुरुषोत्तमदास टंडन म्हणाले होते की, शतकानंतर आमच्या देशात एकदा पुन्हा अशी बैठक बोलावली गेली आहे की आम्हाला आपल्या गौरवशाली इतिहासाची आठवण येते. जेव्हा आम्ही स्वतंत्र होतो तेव्हा सभा आयोजित केल्या जायच्या. ज्यात विद्वान लोक देशातील महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यास येत असे.”

हेही वाचा >> संविधान ते महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेता व्हाया स्वा. सावरकर; श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधी यांच्यात संसदेत तुफान खडाजंगी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसरं वाक्य संविधान सभेचे सदस्य डॉ.राधाकृष्णन यांचं सांगितलं. ते म्हणाले, “या महान राष्ट्रासाठी गणतांत्रिक व्यवस्था नवीन नाहीय. आमच्या येथे हे इतिहासाच्या सुरुवातीपासूनच आहे.” असं म्हणत त्यांनी भारतात पूर्वापार चालत आलेल्या लोकशाही व्यवस्थेचा दाखला दिला.

शेवटी त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य सांगितलं. “भारताला लोकशाही व्यवस्था माहीत नव्हती, असं नाहीय. भारतात पूर्वीपासून अनेक गणतंत्र व्यवस्था होती”, हे आंबेडकरांचं विधानही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत वाचून दाखवलं.

“भारताच्या लोकशाहीचा इतिहास खूप समृद्ध होता. विश्वासाठी प्रेरक राहिला. त्यामुळे भारत आज लोकशाहीची जननी म्हणून ओळखली जाते”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ११ संकल्प जाहीर केले.

  • नागरीक असो वा सरकार सर्वांनी आपल्या कर्तव्यांचं पालन केलं पाहिजे
  • प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक समाजाला विकासाचा लाभ मिळाला पाहिजे. सर्वांच्या साथीने, सर्वांचा विकास झाला पाहिजे.
  • भ्रष्टाचाराच्या प्रती शून्य सहिष्णुता असावी. भ्रष्टाचाऱ्याची सामाजिक स्वीकार्यता नसली पाहिजे.
  • देशाचा कायदा, नियम, परंपरांचं पालन करण्यास देशाच्या नागरिकांना गर्व असला पाहिजे.
  • गुलामीच्या मानसिकतेतून मुक्ती असावी.
  • देशाच्या इतिहासावर गर्व असावा
  • देशाच्या राजकारणात घराणेशाहीतून मुक्ती मिळो..
  • संविधानाचा सन्मान व्हावा. संविधानाचे हत्यार बनू नये.
  • संविधानाच्या भावनेप्रती समर्पण ठेवून ज्यांना आरक्षण मिळतंय ते कोणी रोखू नये.
  • संविधानाच्या निहित भावना We the People हा मंत्र घेऊन पुढे जाऊ… विकसित भारताचं स्वप्न सदनातील प्रत्येकाचं असलं पाहिजे.
  • २०४७ मध्ये भारत जेव्हा स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण करेल तेव्हा विकसित भारत असला पाहिजे.