पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग दिनाचा आढावा घेतला. चंदिगडमध्ये २१ जून रोजी योग दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम घेण्यात येणार असून त्यासाठी १ लाख जणांनी नोंदणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदी चंदिगडमधील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ‘आयुष’चे सचिव अजित शरण यांनी या कार्यक्रमाच्या ठिकाणी ३० हजार नागरिक नोंदणी करणार असल्याने सहभागींची संख्या १ लाख २० हजार होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. या कार्यक्रमासाठी १४ मे पासून नोंदणी सुरू झाली. ८ जूनपर्यंत ९६ हजार जणांनी नोंदणी केल्याचे चंदिगडचे उपायुक्त अजित जोशी यांनी सांगितले. योगासाठी राज्यात १८० ठिकाणी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आल्याचे विनिता गुप्ता यांनी सांगितले.

 

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi reviews of international yoga day
First published on: 16-06-2016 at 02:13 IST