लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती यश मिळवून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकालादिवशी सकाळी दूरचित्रवाणी पाहिला नाही.  दूरध्वनी घेण्यास दुपारनंतर सुरुवात केली. मोदींनीच ही बाब उघड केली आहे. बीबीसीचे माजी पत्रकार लान्स प्रिन्स यांच्या ‘दि मोदी इफेक्ट : इनसाइड नरेंद्र मोदीज कँपेन टू ट्रान्स्फॉर्म इंडिया’ या पुस्तकात अनेक बाबी मोदींनी लेखकाकडे उघड केल्या आहेत. निकालादिवशी पहिला दूरध्वनी तत्कालीन पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांचा होता.
या पुस्तकाच्या निमित्ताने प्राइस यांनी चार वेळा मोदींशी संवाद साधला. वाराणसीतील प्रतिष्ठेच्या लढतीत मोदींनी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचा विशेष उल्लेख केला नाही. त्याबाबत विचारले असता, छोटय़ा शहरातील ते नेते आहेत. केजरीवाल यांनी उमेदवारी जाहीर करताना भूकंप घडवू अशी गर्जना केली होती. माध्यमातील छोटय़ा गटातील हितसंबंधीयांनी केजरीवाल यांना मोठे केले असा निष्कर्ष मोदींनी प्राइस यांच्याशी बोलताना काढला. केजरीवाल य्खासदारही नाहीत अशा वेळी त्यांना महत्त्व कशासाठी द्या असा मोदींचा युक्तिवाद होता.
या पुस्तकात मोदींचे व्यक्तिगत आयुष्य व राजकीय वाटचालींचा पट लेखकाने उलगडला आहे. एखाद्या व्यक्तीवर जनता चटकन विश्वास ठेवते हे गेल्या काही निवडणुकांतून दिसून आले. प्रचाराला जेव्हा फिरलो तेव्हा प्रत्येक सभांमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला. आम्हाला विश्वासू चेहरा हवा पक्ष नको अशी जनतेची मागणी होती. अनेक व्यक्ती व संस्थांनी २०१४ मध्ये पाठिंबा दिला. पंतप्रधानपदासाठी दावेदार होऊ शकतो असा विचारही केला नसल्याचे सांगितले.