करोना संकटामुळे लॉकडाउन जाहीर केल्यानंतर धीम्या गतीने निर्बंध शिथील करण्यात आले. पण आता पुन्हा एकदा राज्यात लॉकडाउन निर्माण होण्याचं संकट निर्माण झालं असून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून तसे संकेत दिले जात आहेत. एकीकडे करोनाचा प्रभाव पुन्हा एकदा वाढत असताना दुसरीकडे लस तयार करण्यासाठी वेगाने काम सुरु आहे. पुण्यातील सिरम इन्सिट्यूटकडे सध्या सर्वांचं लक्ष असून अदर पूनावाला यांनी जानेवारी अखेरपर्यंत लसीचे १० कोटी डोस तयार असतील असं सांगितलं आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी करोना लसीच्या प्रगतीसंबंधी माहिती घेण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता आहे. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविड लस तयार करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ९८ देशांचे राजदूत २७ नोव्हेंबर रोजी भेट देण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासनाची बैठक झाली आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमनी सौरभ राव यांची भेट घेत दौऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींचा दौरा अद्याप प्राप्त झाला नसल्याचं कळत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi serum institute corona vaccine svk 88 sgy
First published on: 24-11-2020 at 08:52 IST