देशात पुन्हा भाजपाप्रणीत एनडीएचे सरकार येणार हा अंदाज अनेक एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आला आहे. पण एनडीए मागच्या निवडणुकीप्रमाणे २८२ जागांचा टप्पा पार करणार की, नाही. ही देशात चर्चा आहे. काँग्रेसने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी म्हणजे ४४ जागा जिंकल्या. आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी जागा लढवण्याचा विक्रम केला अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी मुंबईतील सभेत काँग्रेसवर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईचे लोक हवेची दिशा अचूक ओळखतात. त्यामुळे मजबूत होणाऱ्या भाजपाप्रणीत एनडीएचे हात बळकट करा. तीन टप्प्याच्या मतदानानंतर पुन्हा एनडीएचे सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसला जास्तीत जास्त ५० जागा मिळतील असा दावा मोदींनी केला. काँग्रेसची रणनिती भूतकाळात अडकून पडली आहे. काँग्रेस कनफ्यूजनचे दुसरे नाव आहे.

राजा, वंशवादामध्ये काँग्रेस अडकून पडली आहे. मुंबईने नेहमीच शिवसेना-भाजपाला साथ दिली आहे असे मोदी म्हणाले. मुंबई भारताची अर्थव्यवस्था चालवते. देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनबरोबर मुंबईचे नाव लागणार आहे असे मोदी म्हणाले. २००६ ते २०१४ पर्यंत काँग्रेसच्या राजवटीत मुंबईत फक्त ११ किलोमीटर मेट्रो मार्गावर काम झाले. पुढच्या काही वर्षात मुंबईत पावणेतीनशे किलोमीटरचा मेट्रो मार्ग उपलब्ध होईल असे मोदी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi slam opposition in mumbai meeting
First published on: 26-04-2019 at 20:42 IST