PM Modi Wears Multicoloured Turban : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय प्रसंगी आकर्षक आणि रंगीबेरंगी पगडी किंवा फेटा बांधण्याची परंपरा कायम ठेवली. ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी त्यांनी एक चमकदार लाल आणि पिवळा फेटा परिधान केला होता. निवडली. हा फेटा बहुरंगी दिसत होती.

आजच्या खास कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पांढरा कुर्ता आणि पायजमा घातला होता. त्यावर त्यांनी तपकिरी रंगाचं जॅकेट घातलं होतं. ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय युद्ध स्मारकावर गेले होते. श्रद्धांजलीनंतर ते वार्षिक प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी कर्तव्य पथावर त्यांनी प्रस्थान केलं. पंतप्रधान मोदींनी रविवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाला शुभेच्छा दिल्या.

“आज आपण आपल्या गौरवशाली प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. या निमित्ताने आम्ही त्या सर्व महान व्यक्तींना आदरांजली वाहतो, ज्यांनी आपली राज्यघटना घडवली आणि आपला विकास प्रवास लोकशाही, प्रतिष्ठा आणि एकात्मतेवर आधारित केला. आम्हाला आशा आहे की हा राष्ट्रीय उत्सव आमच्या संविधानाच्या मूल्यांचे जतन करेल आणि एक मजबूत आणि समृद्ध भारत निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना अधिक बळ देईल,” पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले.

२०१४ मध्ये पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनाच्या देखाव्यामध्ये पंतप्रधान रंगीबेरंगी फेटे परिधान करतात. त्यांचं हे नेहमीचे वैशिष्ट्य राहिले आहे. २०२४ च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांनी भारताच्या विविधतेचे प्रदर्शन करणारी ‘बांधणी’ फेटा परिधान केला होता.