भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. तसेच पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त मोदींनी त्यांना आदरांजली वाहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाताळच्या सणानिमित्त मोदींनी जगभरातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देखील दिल्या. दरम्यान मोदींनी गुरूवारी वाजपेयींच्या घरी जाऊन त्यांना वाढदिवसानिमित्त तसेच भारतरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि तेथून मोदी वाराणसीला रवाना झाले. अटलबिहारी वाजपेयी यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज ‘सुशासन दिवस’ साजरा करण्यात येत आहे, असे ट्विट मोदींनी केले आहे. नवाझ शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतो, असे नमूद करत मोदींनी शरीफ यांना त्यांची मुलगी मरियम शरीफ हिच्या अकाऊंटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. केंद्र सरकारने अटल बिराही वाजपेयींच्या वाढदिवासाच्या एक दिवस आधीच त्यांना व मदन मोहन मालवीय यांना सर्वोच्च नागरी सन्मान समजला जाणारा ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर केला. तसेच वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त सरकारकडून आजचा दिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm wishes nawaz sharif and atal ji
First published on: 25-12-2014 at 12:50 IST