पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडन येथून अटक करण्यात आली. अटकेनंतर नीरव मोदीला न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी आता पुढील सुनावणी २९ मार्च रोजी होणार आहे. न्यायालयाने नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. भारतात घोटाळा करुन फरार झालेल्या या उद्योगपतीविरोधात लंडनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. भारतात प्रत्यार्पण प्रकरणाची सुनावणी आता न्यायालयात केली जाणार आहे. याचदरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाकडून नीरव मोदीची संपत्ती विकली जाऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनावणीदरम्यान नीरव मोदीने जामिनाची विनंती केली. तपास यंत्रणांना आपले पूर्ण सहकार्य राहील. प्रवासासंबंधीचे सर्व कागदपत्रे मी सादर करेन असे त्याने न्यायालयाला म्हटले. मात्र, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने भारताच्या अंमलबजावणी संचालनालयाकडून प्रत्यार्पण अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर अटक वॉरंट लागू केले होते. त्यानंतर नीरव मोदीला कधीही अटक केले जाऊ शकते, असे सांगण्यात आले होते.

नीरव मोदी सध्या लंडनमध्ये ऐषोरामी जीवन जगत होता. तो लंडनमधील वेस्ट एंड परिसरातील सुमारे ७३ कोटी रूपये किंमत असलेल्या अर्पाटमेंटमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येते. नुकताच त्याला माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टिपले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pnb fraud case nirav modi arrested by london police
First published on: 20-03-2019 at 15:02 IST