हैदराबाद पोलिसांनी पी भार्गवी या ३२ वर्षीय केअरटेकरला अटक केली आहे. एका ७३ वर्षीय महिलेला हार्पिक आणि झंडू बामच्या विषारी मिश्रणाने आंधळे केल्याबद्दल आणि नंतर तिला लुटल्याबद्दल तिला अटक करण्यात आली.या प्रकाराने वृद्धांच्या देखभालीची, सुरक्षेची चिंता निर्माण झाली आहे.


हेमावती (७३) या सिकंदराबाद येथील नचाराम येथील अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये एकट्या राहत होत्या. लंडनमध्ये राहणारा तिचा मुलगा शशिधर याने ऑगस्ट २०२१ मध्ये भार्गवीला लिव्ह-इन हाउसकीपर म्हणून नियुक्त केले होते. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, भार्गवी तिच्या सात वर्षांच्या मुलीसह हेमावतीच्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेली. ती चोरी करण्याच्या संधीची वाट पाहत होती. ऑक्टोबरमध्ये भार्गवीने हेमावतीला डोळे चोळताना पाहिले. तिने हेमावतीच्या डोळ्यात औषध टाकत असल्याचं सांगून तिने बाथरूम साफ करणारं रसायन आणि बाम पाण्यात मिसळले आणि वृद्ध महिलेच्या डोळ्यांना लावले.

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच
dawood ibrahim marathi news, extortion dawood ibrahim marathi news
खंडणीप्रकरणातून दाऊदच्या पुतण्यासह तिघांची निर्दोष सुटका
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण


काही दिवसांनंतर जेव्हा हेमावती यांनी डोळ्याचा संसर्ग झाल्याचं आपल्या मुलाला सांगितलं तेव्हा त्याने तिला जवळच्या खाजगी रुग्णालयात पाठवले. मात्र, तिची दृष्टी खराब झाल्याने तिची मुलगी उर्वशीने तिला पुन्हा रुग्णालयात नेले, मात्र काहीही समोर आलं नाही. हेमावती यांनी आपली दृष्टी पूर्णपणे गमावल्यानंतर, शशीधर यांनी हैदराबादला भेट दिली आणि आईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेले.


डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांना सांगितले की, तिच्या डोळ्यातील विषारी द्रवामुळे तिला अंधत्व आले आहे. हा प्रकार समजल्यानंतर कुटुंबीयांना केअरटेकर भार्गवी हिच्यावर संशय येऊ लागला. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली, त्यांनी तिची चौकशी केली. चौकशीदरम्यान भार्गवीने आपणच तिला आंधळे करून ४०,००० रुपये रोख, दोन सोन्याच्या बांगड्या, सोन्याची चेन आणि इतर काही दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी बुधवारी तिला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावली.