police offers milk and flowers to floodwater entering his home Viral Video : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील एक पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा अधिकारी घराच्या बाहेर आलेल्या पुराच्या पाण्याची पूजा करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. विशेष बाब म्हणजे ते पुराचे पाणी त्याच्या घरात घुसत असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत उत्तर भारतातील अमेक भागात पावसाने कहर केला आहे . या दरम्यान दूध आणि फुले वाहून पूजा करत असलेल्या या अधिकाऱ्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
या अधिकाऱ्याचे नावा चंद्रदीप निषाद असे असून ते या व्हिडीओमध्ये त्यांच्या गणवेशात त्यांच्या घराच्या समोर असलेल्या रस्त्यावरील पुराच्या पाण्याला ‘गंगा माता’ म्हणत फुलाच्या पाकळ्या आणि दूध वाहताना दिसत आहे.
या पोलिस अधिकाऱ्याने हा व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. याला त्यांनी कॅप्शन दिले आहे की, “आज सकाळी कामावर निघताना आमच्या घरी माता गंगेचे आगमन झाले. दरवाजावर माता गंगेचे दर्शन पूजन करून आशीर्वाद घेतले. जय गंगा मैया.”
निषाद यांनी त्यांच्या इंस्टाग्राम बायोमध्ये त्यांनी “पीएसओ माननीय न्यायाधीश अलाहाबाद उच्च न्यायालय, राष्ट्रीय जलतरणपटू आणि उत्तर प्रदेश पोलिस स्विमिंग चॅम्पियन,” अशा पद्धतीने स्वतःचे वर्णन केले आहे.
दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये निषाद हे पाण्यात डुबकी घेताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये पाणी त्यांच्या छातीपर्यंत आल्याचे पाहायला मिळत आहे. या दोन्ही व्हिडीओवर लोकांच्या समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. लोक या अधिकाऱ्याच्या आस्थेबाबत त्याचे कौतुक करत आहेत तर काही जण पुराच्या परिस्थितीमुळे चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.
गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पुराची स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अनेक ठिकाणी लोकांच्या घरांचे देखील नुकसान झाले आहे.