केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचे निकटवर्तीय असणारे तसेच मध्य प्रदेश सरकारमध्ये पंचायत आणि ग्राम विकास मंत्री असणाऱ्या महेंद्र सिंह सिसोदिया यांनी लोकसंख्येसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुस्लीम समाजातील लोक २ ते ३ लग्न करतात आणि १०-१० मुलं जन्माला घालतात. त्यांच्यावर नियंत्रणं ठेवण्यात आलं पाहिजे, असं सिसोदिया म्हणाले आहेत. गुना मतदारसंघामध्ये पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सिसोदियांनी हे वक्तव्य प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे.

एका प्रश्नावर उत्तर देताना सिसोदिया यांनी मुस्लीम समाजावर टीका केली. “लोकसंख्या नियंत्रणासाठी आधीपासूनच बरेच कायदे आहेत. मात्र समान नागरी कायदा असणं गरजेचं आहे. प्रत्येक समाजातील व्यक्तीने किती मुलांना जन्माला घालावं याची संख्या ठरवली पाहिले. मुस्लीम समाजामध्ये हा आकडा ठरलेला नाही. ते त्यांच्या इच्छेप्रमाणे दोन-दोन, तीन-तीन लग्न करतात आणि दहा-दहा मुलांना जन्म घालतात, त्यांच्यावर बंधनं घातली पाहिजेत,” असं सिसोदिया म्हणाले.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

नक्की वाचा >> “…म्हणून मुस्लीम आठ मुलं जन्माला घालतात”; ‘टू चाइल्ड पॉलिसी’वरुन केली टीका

यापूर्वीही केलं आहे वादग्रस्त विधान…

यापूर्वीही सिसोदिया यांनी अशाप्रकारे वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. गुना येथे एका रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपण अधिकाऱ्यांना येथे रस्ता बनवण्यासाठी कठोर निर्देश दिले होते असं सांगताना यासाठी अगदी नियम आणि कायद्याचं उल्लंघन करावं लागलं तरी हरकत नाही अशी सूटही अधिकाऱ्यांना दिल्याचं म्हणाले होते. रस्ता बांधण्यासाठी आपण किती काम केलं आहे हे सांगताना सिसोदियांनी हे वक्तव्य केलं होतं.

नक्की वाचा >> उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरणाला फडणवीसांचा पाठिंबा, म्हणाले “गरज पडल्यास…”

“मी मुख्यमंत्री आणि खासदारांकडेही रस्त्यासंदर्भात विनंती केलेली. मात्र त्यांनी अर्थसंकल्पामध्ये तरतूद नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हा पंचायतच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी यासाठी कोट्यावधी रुपये लागतील असं सांगितलं होतं. त्यानंतर मी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत बैठक बोवली. त्यावेळी मी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितलं होतं की येथील लोक वर्षानूवर्षे नवीन रस्त्याच्या प्रतिक्षेत आहे. नियम, कायद्यांचं उल्लंघन झालं तरी हरकत नाही इथे रस्ता झालाच पाहिजे असं मी त्यांना म्हणालो होतो,” असं सिसोदिया यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> “ओवैसींच्या मदतीने योगी पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी उत्तर प्रदेश सोडून निघून जाईन”

मनुव्वर राणांनी लगावलेला योगी सरकारला टोला…

दरम्यान, काही दिवसांपूवीच लोकप्रिय शायर मुनव्वर राणा यांनी लोकसंख्या नियंत्रण धोरणावरुन उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर निशाणा साधला होता.  “लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या गोष्टी करणाऱ्या सरकारला मला हे सांगायचं आहे की मुस्लीम आठ मुलं यासाठी जन्माला घालतात कारण त्यांना भीती असते की त्यांची दोन मुलं दहशतवादी म्हणून मारली जाऊ शकतात, दोघं करोनाने मरु शकतात मग अशावेळी आई-बापाची पार्थिव स्मशानभूमीपर्यंत पोहचवायला कोणीतरी हवं ना?”, असा खोचक टोला राणा यांनी मुलाखतीदरम्यान लगावला होता.