Pragya Singh Thakur claim tortured forced to take name of PM Modi : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता झालेल्या माजी भाजपा खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मोठा खुलासा केला आहे. तुरूंगात घालवलेल्या दिवसांबद्दल बोलताना आपला छळ करण्यात आल्याचे ठाकूर म्हणाल्या आहेत. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, एटीएस अधिकाऱ्यांनी मला १३ दिवस बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले. या काळात वेगवेगळ्या लोकांची नावे घेण्यासाठी छळ करण्यात आला. यावेळी त्यांनी ही नावे कोणती होती याबद्दल देखील माहिती दिली आहे

मोदी, योगी, भागवत यांची नावे घेण्यासाठी दबाव

प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या की, मला नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, सुदर्शन, इंद्रेश, रामजी माधव सारख्या लोकांची नावे घेण्यासाठी भाग पाडले जात असे. ते म्हणत की या लोकांची नावे घेतली तर आम्ही तुला मारणार नाहीत. त्यांचा मुख्य उद्देश मला टॉर्चर करणे हाच होता. मला खोटे बोलण्यास सांगितले जात होते. त्यामुळे मी कोणाचेही नाव घेतले नाही.

भाजपाच्या माजी खासदार म्हणाल्या की, या लोकांनी थळ करून खूप काही वदवून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र मी खोटे बोलले नाही. देशाला घाबरण्याची आवश्यकता नाही. देशभक्त आपल्या देशासाठी जगतो आणि मरतो. प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या की एटीएस अधिकाऱ्यांनी कायद्याच्या नावाखाली अनेक बेकायदेशीर कामे केली. माझा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला.

कोर्टाच्या निर्णयावर प्रज्ञासिंह ठाकू म्हणाल्या की, हा भगव्याचा विजय आहे, धर्माचा विजय आहे आणि सनातन धर्माचा विजय आहे. या लोकांमध्ये इतकी हिंमत नाही की पराभूत करू शकतील. या लोकांनी छळ करून भगवा आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा नीच प्रयत्न केला आहे. अशा लोकांना शिक्षा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे संपूर्ण प्रकरण तयार करण्यात आले होते, याला कसलाच आधार नव्हता, सत्य उघड होत असते, या प्रकरणात देखील असेच झाले.