Prajwal Revanna Sex Scandal : कर्नाटकच्या सेक्स स्कँडलमध्ये भाजपा नेत्याने आज एक मोठा दावा केला आहे. २९०० हून अधिक अश्लील व्हिडीओंचा एक पेन ड्राईव्ह मिळाल्याचं भाजपाने म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणात माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि खासदार प्रज्ज्वल रेवण्णांचं नाव समोर आलं आहे. ज्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनुसार २०२४ मध्ये होलनरसीपुरातले भाजपाचे उमेदवार देवराज गौडा यांनी बी. वाय. विजयेंद्र यांना एक पत्र लिहिलं होतं. ज्या पत्रात प्रज्ज्वल रेवण्णा आणि एच.डी. देवेगौडा यांच्या कुटुंबातील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. देवराज यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे जो पेनड्राईव्ह आहेत त्यात २९७६ अश्लील व्हिडीओ आहेत. या व्हिडीओंमधल्या काही महिला सरकारी कर्मचारी असल्याचाही दावा करण्यात आला आहे. महिलांचं लैंगिक शोषण सुरु ठेवण्यासाठी त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी या व्हिडीओंचा वापर केला जातो असंही देवराज यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपाचे नेते देवराज यांनी हे म्हटलं आहे की पेनड्राईव्ह मधले काही फोटो आणि व्हिडीओ असे आहेत जे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांकडेही गेले होते.

जनता दलाच्या पिछेहाटीबरोबरच देवेगौडा कुटुंबातच पराभवांची मालिका सुरू

भाजपाने काय दावा केला आहे?

भाजपाने हेदेखील म्हटलं आहे की या व्हिडीओंमध्ये प्रज्ज्वल रेवण्णाच आहेत. कारण ते काही व्हिडीओंमध्ये दिसत आहेत. त्यांना त्यांच्या पक्षाने पक्षातून काढून टाकावं अशी मागणी मी करतो आहे. दुसरीकडे कर्नाटकच्या महिला आयोगानेही हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष नागलक्ष्मी चौधरी म्हणाल्या की या प्रकरणात आम्ही एसआयटी चौकशी सुरु केली आहे. एसआयटीमध्ये कुशल अधिकारी आहेत ते या प्रकरणाचा योग्य तपास करतील. तसंच मला पीडितांबाबत चिंता वाटते आहे असंही चौधरी यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत प्रज्वल रेवण्णा?

प्रज्ज्वल रेवण्णा हे देवेगौडा कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीचे नेते आहेत. कर्नाटकचे पाटबंधारे विभागाचे मंत्री एच. डी. रेवण्णा यांचे ते पुत्र आहेत. एच. डी. रेवण्णा आणि एच. डी. कुमारस्वामी हे दोघं भाऊ आहेत. त्यामुळे कुमारस्वामी हे प्रज्ज्वल रेवण्णांचे काका आहेत.

प्रज्ज्वल रेवण्णांनी बंगळुरुतल्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेडिकल इंजिनिअरिंग केलं आहे. राजकारणातही ते सक्रिय आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

JDS या पक्षाचे सचिव म्हणून प्रज्ज्वल रेवण्णांची नियुक्ती २०१९ मध्ये करण्यात आली. आता त्यांच्यावर सेक्स स्कँडल प्रकरणात सहभाग असल्याचे आरोप झाले आहेत.