‘चाचा चौधरी आणि साबू’ ही प्रसिद्ध व्यंगचित्र व्यक्तिमत्त्व रेखाटणारे आणि तब्बल चार दशकांहून अधिक काळ शाळकरी मुलांचे भावविश्व व्यापून टाकणारे प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्राणकुमार शर्मा यांचे बुधवारी गुरगाव येथील रुग्णालयात कर्करोगाने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. प्राण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शर्मा यांनी चाचा चौधरी, साबू, रामन यांसह अनेक पात्रे व्यंगचित्रांमार्फत अजरामर केली.
पाकिस्तानातील कासूर येथे १९३८ मध्ये जन्मलेल्या प्राण यांनी सर्वप्रथम दिल्लीतील ‘मिलाप’ या वृत्तपत्रासाठी व्यंगचित्र मालिका सुरू केली. या व्यंगचित्रातील पात्राचे नाव होते डाबू. १९६९ मध्ये त्यांनी ‘चाचा चौधरी’ हे पात्र ‘लोटपोट’ या हिंदी मासिकात व्यंगचित्र मालिकेद्वारे प्रसिद्ध केले आणि अल्पावधीतच लोकप्रिय झाले. प्राण यांनी छोटय़ा वर्तमानपत्रांसाठी व्यंगचित्रे काढली.
“प्राण यांच्याशी १९८१ मध्ये माझी ओळख झाली. त्या वेळी भारतात कॉमिक म्हणजे व्यंगचित्रमालिका हा प्रकारच नव्हता. परदेशी मालिकांचे हक्क घेऊन ती पुनप्र्रकाशित केली जात असत. मात्र गेली ३५ वर्षे आम्ही त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध करीत आहोत. व्यंगचित्र मालिकांद्वारे प्राण यांनी साधी व विनोदी चित्रशैली निर्माण केली, असे डायमंड कॉमिक्सचे प्रकाशक गुलशन राय यांनी सांगितले. प्राण हे चतुरस्र व्यंगचित्रकार होते. त्यांनी अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.”
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
संग्रहित लेख, दिनांक 7th Aug 2014 रोजी प्रकाशित
ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्राणकुमार शर्मा कालवश
‘चाचा चौधरी आणि साबू’ ही प्रसिद्ध व्यंगचित्र व्यक्तिमत्त्व रेखाटणारे आणि तब्बल चार दशकांहून अधिक काळ शाळकरी मुलांचे भावविश्व व्यापून टाकणारे प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्राणकुमार शर्मा यांचे बुधवारी गुरगाव येथील रुग्णालयात कर्करोगाने निधन झाले.

First published on: 07-08-2014 at 01:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pran kumar sharma the man behind chacha chaudhary passes away