विद्यापीठे आणि उच्चशिक्षण देणाऱ्या संस्था मुक्त विचारस्वातंत्र्याचे बालेकिल्ले झाले पाहिजेत आणि वादविवाद आणि व्यापक चर्चा यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी येथे व्यक्त केले.

नालंदा विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारंभात मुखर्जी पुढे म्हणाले की, १३व्या शतकात नष्ट होण्यापूर्वी १२०० वर्षे भरभराटीला आलेली संस्कृती आणि संकल्पना यांचे विद्यापीठ हे प्रतििबब आहे.

अनेक शतकांपासून भारताने शिक्षणाच्या माध्यमातून मैत्री, सहकार्य, व्यापक चर्चेचा संदेश दिलेला आहे. ‘दी आग्र्युमेण्टेटिव्ह इंडिया’ या आपल्या पुस्तकातून डॉ. अमर्त्य सेन यांनी त्याचेच महत्त्व अधोरेखित केले आहे, असेही मुखर्जी म्हणाले.