पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्याला पंजाबमध्ये अडवण्यात आल्यानंतर ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’चं कारण देत बुधवारी पंतप्रधानांनी पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. त्यानंतर आज पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन नक्की काय घडलं यासंदर्भातील माहिती दिल्याचं ट्विट राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: फ्लायओव्हरवर अडकलेला ताफा, कारमध्ये बसलेले PM मोदी, सुरक्षारक्षकांचा वेढा अन्…

NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन
lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम
AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’

“राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची राष्ट्रपती भवनामध्ये आज भेट घेतली. काल पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या ताफ्यासोबत घडलेल्या सुरक्षेसंदर्भातील त्रुटींची माहिती राष्ट्रपतींनी पंतप्रधानांकडून घेतली. यावेळेस राष्ट्रपतींनी या सुरक्षेच्या त्रुटीसंदर्भात चिंता व्यक्त केली,” अशा कॅप्शनसहीत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या भेटीदरम्यानचे दोन फोटो पोस्ट करण्यात आलेत.

नक्की वाचा >> “रस्ता अडवून भाजपा नेत्यांना खराब रस्त्याने प्रवास करण्यास भाग पाडणारे आंदोलक कौतुकास पात्र”

दरम्यान, दुसरीकडे आज (६ जानेवारी २०२१ रोजी) सकाळीच पंजाब सरकारने पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान झालेल्या त्रुटींच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केल्याची माहिती पंजाब सरकारच्या अधिकृत प्रवक्त्यानी दिलीय. या समितीमध्ये न्यायमूर्ती (निवृत्त) मेहताब सिंग गिल, प्रधान सचिव (गृह व्यवहार) आणि न्यायमूर्ती अनुराग वर्मा यांचा समावेश असेल आणि ते ३ दिवसांत अहवाल सादर करतील, असे पंजाब सरकारने सांगितले.

नक्की वाचा >> मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी: राष्ट्रवादी म्हणते, “राज्यानेही तपास करु नये आणि केंद्रानेही करु नये कारण…”

सर्व कार्यक्रम रद्द करुन मोदी परतले
शेतीविषयक कायदे रद्द केल्यानंतर जवळपास सर्व शेतकरी संघटनांनी आपले आंदोलन संपवले असताना, पंजाबमधील सर्वात मोठी शेतकरी संघटना अशी ओळख असणाऱ्या भारतीय किसान युनियने (क्रांतीकारी) (बीकेयू क्रांतीकारी) अजूनही केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरु ठेवले आहे. याच संघटनेच्या आंदोलकांनी बुधवारी फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा अडवला. त्यामुळे मोदी हे भटिंडामधील पुलावर १५-२० मिनिटे अडकून पडले. अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.