कचरा कुंडीत सापडलेल्या एका तान्ह्या बाळाला कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षकाने मातृत्वाचे कर्तव्य निभावत व माणुसकीचे दर्शन घडवत स्तनपान करत त्याचा जीव वाचवला होता. ही घटना मागिलवर्षी मध्य प्रदेशमध्ये घडली होती. अनिला पराशर असे नाव असलेल्या या पोलिस उपनिरीक्षक महिलेचा तिच्या कर्तृत्वाबद्दल आदर्श व्यक्तिमत्व पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा पुरस्कार त्यांना दिल्लीतील लाजपत भवनातील सभागृहात १८ ऑगस्ट रोजी दिला जाणार आहे. मध्य प्रदेश पोलिस विभागातून हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या एकमेव पोलिस महिला आहेत.

पराशर यांनी सांगितले की, माझी किशनगंज येथील पोलिस ठाण्यात उप निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. २ ऑगस्ट २०१८ रोजी मला पोलिसांचा मदत क्रमांक असलेल्या १०० नंबरवर फोन आला व कचरा कुंडीत एक बाळ आढळून आले असल्याचे सांगण्यात आले. यानंतर मी तातडीने संबंधित ठिकाणी पोहचले व त्या बाळाला उचलले. ते केवळ दोन दिवसांचं बाळ होतं, भुकेने व्याकुळ झालेल्या त्या बाळाचा घसा रडून रडून लाल झाला होता. मी त्याला अगोदर थेट रूग्णालयात घेऊन गेले, मात्र तरी देखील त्याच रडणं सुरूच होत. अखेरीस मला न राहवल्याने मी त्याला स्तनपान करणं सुरू केलं, त्यानंतर आलेल्या डॉक्टरांनी देखील त्याला स्तनपानाची अत्यंत गरज होती, नसता त्याचा भुकेने बळी गेला असता असे सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pride of a policewoman who breastfeeds an orphaned baby msr
First published on: 23-07-2019 at 14:57 IST