नवी दिल्ली : या वर्षीच्या पहिल्या विदेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीन दिवसांच्या प्रवासात २५ कार्यक्रम असतील. सोमवारपासून हा तीन देशांचा दौरा सुरू होईल. सात देशांच्या ८ जागतिक नेत्यांसोबत पंतप्रधान द्विपक्षीय तसेच बैठका घेतील, तसेच ५० जागतिक उद्योगपतींशीही चर्चा करतील. याशिवाय भारतीय समुदायाच्या हजारो सदस्यांशीही ते संवाद साधतील. युक्रेनमधील संकटाच्या पार्श्वभूमीवर, मोदी हे २ मेपासून जर्मनी, डेन्मार्क व फ्रान्स या देशांचा दौरा करतील. पंतप्रधान आधी जर्मनीला व नंतर डेन्मार्कला जातील परतीच्या प्रवासात ४ मे रोजी काही काळासाठी पॅरिसला थांबतील. पॅरिसमध्ये ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी, तर बलिर्नमध्ये जर्मनीचे फेडरल चान्सलर ओलाफ शूल्झ यांच्यासोबत द्विपक्षीय बोलणी करतील, असे सूत्रांना सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 1st May 2022 रोजी प्रकाशित
पंतप्रधान सोमवारपासून परदेश दौऱ्यावर
या वर्षीच्या पहिल्या विदेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीन दिवसांच्या प्रवासात २५ कार्यक्रम असतील.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 01-05-2022 at 00:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister foreign tour monday travelling world leaders ysh