संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधकांनी पेगॅसस, कृषी कायद्यांवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज वारंवार स्थगित करावं लागतं आहे. दुसरीकडे राज्यसभेत सत्ताधारी भाजपाचे खासदार गैरहजर राहात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपा संसदीय दलाच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. तसेच गैरहजर राहणाऱ्या खासदारांची यादी मागितली आहे. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक २०२१ राज्यसभेत मांडल्यानंतर गैरहजर असलेल्या खासदारांबद्दल नाराजी व्यक्क केली आहे. हे विधेयक विरोधकांच्या गोंधळात पास झालं आहे. चर्चेवेळी विरोधकांनी जोरदार गोंधळ केला. विधेयक आवाजी मतदानाने पारित करण्यात आलं. या विधेयकात चित्रपट कायदा, सीमाशुल्क कायदा, ट्रेड मार्क्स यासह अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
विरोधकांनी विधेयक निवड समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर त्यावर मतांचे विभाजन करण्याची मागणी करण्यात आली. प्रस्तावाच्या बाजूने ४४ मतं, तर विरोधात ७९ मत पडली. यामुळे विरोधकांची मागणी रद्द झाली. त्यानंतर बिल आवाजी मतदानाने पारित झालं. या मतदानावेळी भाजपाचे काही खासदार गैरहजर होते. या खासदारांची यादी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितली आहे.
During the parliamentary meet, PM Modi suggested party MPs encourage more participation in sports activities, take note of nationwide malnutrition status and promote PM Garib Kalyan Anna Yojana countrywide. pic.twitter.com/2Z6ZQmD8Zr
— ANI (@ANI) August 10, 2021
भाजपाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित खासदारांना क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यास सांगितलं आहे. तसेच पोषण अभियान आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला प्रोत्साहन देण्याच्या सूचना केल्या आहेत.