पीटीआय, नवी दिल्ली
लोकांना ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देऊन सायबर गुन्हे करणाऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मधून दखल घेतली. अशा प्रकारच्या धमक्या कुणाला येत असतील, तर सर्व नागरिकांनी ‘थांबा, विचार करा आणि मग कृती करा’ या मंत्राचा वापर करा, असा सल्ला त्यांनी दिला. असे पाऊल उचलले, तर नागरिकांना ‘डिजिटल सुरक्षा’ मिळेल, असे ते म्हणाले.

‘अशा सायबर धमक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सायबर संस्था काम करीत आहेत. पण, अशा गुन्ह्यांपासून रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता हवी,’ असे मत मोदींनी व्यक्त केले.

सायबर गुन्ह्यांना बळी पडलेल्यांचा फोनवरील संवादही मोदी यांनी कार्यक्रमात प्रसारित केला. मोदी म्हणाले, ‘कुठलीही चौकशी करणारी संस्था अशा प्रकारे फोन करून किंवा व्हिडिओ कॉल करून चौकशी करीत नाही. त्यामुळे ‘थांबा, विचार करा आणि मग कृती करा’ या मंत्राचा वापर करा,’ असे आवाहन पंतप्रधानांनी केले. १९३० हा हेल्पलाइन क्रमांक मोदींनी या वेळी सांगितला आणि अशा घटन्र्रा ू८ुी१ू१ेी. ॅ५. ल्ल या वेबसाइटवर नोंदवा, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा : बांगलादेशी हिंदूंचे संरक्षण आवश्यक, स्थलांतर न करण्याचे होसबाळे यांचे आवाहन

सरदार पटेल, भगवान बिरसा मुंडा यांची दीडशेवी जयंती साजरी करणार

सरदार वल्लभभाई पटेल आणि भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करण्याचीही त्यांनी घोषणा केली. पटेल यांची दीडशेवी जयंतीचे कार्यक्रम 31 ऑक्टोबरपासून, तर बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे कार्यक्रम १५ नोव्हेंबरपासून सुरू होतील. या वर्षी पटेल यांची जयंती आणि दिवाळी एकत्र येत असून, ‘रन फॉर युनिटी’ हा कार्यक्रम २९ ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

‘छोटा भीम’, ‘हनुमान’ची दखल

‘छोटा भीम’, ‘हनुमान’, ‘मोटू-पतलू’ या भारतीय अॅनिमेटेड मालिकांची दखल पंतप्रधानांनी घेतली. जगामध्ये भारत नवी क्रांती आणण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून, देशाला जगातील अॅनिमेशन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र बनविण्यासाठी कटिबद्ध राहा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. भारतीय हुशारीची दखल परदेशातही घेतली जात असल्याचे ते म्हणाले. ‘स्पायडर मॅन’ किंवा ‘ट्रान्सफॉर्मर’ यांसारख्या चित्रपटांतून हरिनारायण राजीव यांच्या योगदानाची जगभरातील लोकांनी कौतुक केल्याचेही त्यांनी सांगितले. डिस्ने, वॉर्नर ब्रदर्स यांसारख्या विख्यात स्टुडिओंबरोबर भारतातील लोक काम करीत असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा : इस्रायलच्या हल्ल्यात २२ जण ठार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हर्च्युअल टूरचाही उल्लेख

‘व्हर्च्युअल टूरसारखे अॅनिमेशन क्षेत्रही विस्तारले आहे. व्हर्च्युअल टूर मध्ये लोक वाराणसीचा घाट, कोणार्क मंदिर, अजिंठा लेणी एका जागी बसून पाहतात. व्हीआर अॅनिमेशनच्या माध्यमातून पाहिल्यानंतर अनेकांना या ठिकाणी प्रत्यक्ष जावेसे वाटते,’ असे मोदी म्हणाले.