अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना प्रिन्सटन विद्यापीठातील एका प्राध्यापकाने घरचा अहेर दिला. ओबामा हे युद्ध गुन्हेगार असल्याची जळजळीत टीका प्राध्यापक कॉर्नल वेस्ट यांनी एका नभोवाणीवरील कार्यक्रमात केली.
कृष्णवर्णीय वेस्ट हे कठोर शब्दांत प्रहार करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. ते ओबामा यांचे कट्टर टीकाकार म्हणून ओळखले जातात. अमेरिकेने गेल्या काही वर्षांत ज्या देशांमध्ये आपले सैनिक पाठवून युद्ध केले, तिथे आतापर्यंत २०० निष्पाप मुलांचा बळी गेला असल्याचे सांगून वेस्ट यांनी ओबामांची तुलना अमेरिकेचे माजी अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्याशी केली.
स्वातंत्र्याच्या नावाखाली निष्पाप लोकांचे बळी घेणारे निक्सन, बुश आणि ओबामा हे युद्ध गुन्हेगारच आहेत. त्यांनी कायद्याचे बेफिकीरपणे उल्लंघन केले असल्याचाही वेस्ट यांचा आरोप आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Feb 2013 रोजी प्रकाशित
बराक ओबामा हे युद्ध गुन्हेगार : अमेरिकेतील प्राध्यापकाकडून घरचा अहेर
ओबामा हे युद्ध गुन्हेगार असल्याची जळजळीत टीका प्राध्यापक कॉर्नल वेस्ट यांनी एका नभोवाणीवरील कार्यक्रमात केली.
First published on: 16-02-2013 at 05:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Princeton professor calls barack obama war criminal who killed over 200 children