दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ वेळा फोन आले. ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा होतो, असा गौप्यस्फोट आज संसदेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला. शेवाळे यांच्या गंभीर आरोपानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनी राहुल शेवाळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “या लोकांनी गद्दारी केली आहे, ते संसदेतील गद्दार सदस्य आहेत, यांचा लवकरच संसदेतील अंत होणार आहे, कारण भाजपादेखील कंटाळून यांना सोडणार आहे. चार दिन की चांदणी फिर अंधेरी रात… असा किस्सा होत आहे. काहीपण खोटे आरोप लावले जातात, संसदेचा चुकीचा वापर करतात. हा अधिकारांचा गैरवापर आहे.” टीव्ही 9 शी त्या बोलत होत्या.

याशिवाय, “मी पुन्हा एकाद सांगेन की त्यांनी जरा आपल्या स्वत:कडे बघावं, थोडा अभ्यास करून आरोप करावेत. ज्यांची अक्कल गुडघ्यात असते, ते अशाप्रकारे बोलतात. ते काहीही आरोप करतात. ते स्वत: एक आरोपी आहेत, तर ते कोणत्या तोंडाने बोलत आहेत. कदाचित यांना माहिती नाही की राजकारण कशासाठी असतं, यांनी राजकारण केवळ गद्दारीसाठी केलं. राजकारणात भेटीगाठी होत असतात, तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरेंना स्वत: निमंत्रिण दिलं होतं, की जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही यावं. ती केवळ औपचारिक भेट होती, ज्यांच्या मनात बेईमानी असते त्यांना संपूर्ण जग बेईमान वाटतं.” अशा शब्दांत प्रियंका चतुर्वेदींनी शेवाळेंवर टीका केली आहे.

हेही वाचा – सुशांत सिंह राजपूत प्रकरण: थेट अदित्य ठाकरेंचा उल्लेख करत बंडखोर राहुल शेवाळेंनी लोकसभेत उपस्थित केला मुद्दा; म्हणाले, “४४ वेळा…”

याचबरोबर, “या लोकांना कोण महत्त्व देतं?, मात्र त्यांनी आज संसदेत ते बोलले आहेत. कारण, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे संकटात सापडले आहेत. ज्याप्रकारे त्यांनी बांधकाम व्यावसायिकांना जमीन दिली आहे आणि न्यायालायने त्यांची बाजू फेटाळली आहे. यावरून ही स्पष्टपणे भ्रष्टाचारीच केस दिसत आहे.” असंही यावेळी चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chaturvedis response to rahul shewales sensational statement about aditya thackeray msr
First published on: 21-12-2022 at 18:30 IST