पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी झाल्याचा गंभीर आरोप झाला. यानंतर भाजपाने काँग्रेसशासित पंजाब सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना या विषयावर माहिती देण्यावरच आक्षेप घेतला. तसेच विद्यमान मुख्यमंत्र्यांनी प्रियंका गांधी यांना माहिती द्यायला त्यांच्याकडे कोणतं संवैधानिक पद आहे? असा सवाल केला. यावर आता स्वतः प्रियंका गांधी यांनीच प्रत्युत्तर दिलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रियंका गांधी म्हणाल्या, “माझ्याकडे कोणतंही संवैधानिक पद नाही. मी जेव्हा टेलिव्हिजनवर पंतप्रधानांच्या सुरक्षेचा मुद्दा पाहिला तेव्हा मला पंतप्रधानांची काळजी वाटली. ते ठिक आहेत ना, पंजाबमधील आमच्या सरकारने सुरक्षा नीट हातळली नाही का याची माहिती घेण्यासाठी मी सहकारी म्हणून चन्नी यांच्याशी बोलले. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत हे मला इथं स्पष्ट करायचं आहे.” प्रियंका गांधी इंडिया टुडेशी बोलत होत्या.

पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या विषयाचं राजकारण केलं जाऊ नये, असंही यावेळी प्रियंका गांधी यांनी सांगितलं. तसेच या प्रकरणाचा तपास होऊ दिली पाहिजे, असंही नमूद केलं.

भाजपाचा नेमका काय आक्षेप?

हेही वाचा : पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा भीती वाटली नाही, आपल्याच देशात फिरायला यांना भीती वाटते : कन्हैया कुमार

भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा म्हणाले होते, “एक विद्यमान मुख्यमंत्री प्रियंका गांधी यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत माहिती का देत आहे? प्रियंका गांधी यांच्याकडे कोणतं संवैधानिक पद आहे की त्यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत माहिती द्यावी? आम्हाला ठामपणे वाटतं की गांधी कुटुंबाने या विषयावर काहीही न लपवता प्रामाणिकपणे सर्व गोष्टी समोर आणाव्यात.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka gandhi answer on why panjab cm channi brief her over pm security breach pbs
First published on: 10-01-2022 at 15:53 IST