Pakistani Writer Tarek Fatah Passed Away: प्रख्यात पाकिस्तानी स्तंभलेखक आणि लेखक तारेक फतेह यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. तारेक फतेह मागील अनेक दिवसांपासून कर्करोगाशी संघर्ष करत होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ते ७३ वर्षांचे होते. त्यांचं कॅनडामध्ये निधन झालं असून त्यांची मुलगी नताशा फतेह यांनी याची पुष्टी केली.

“पंजाबचा सिंह… हिंदुस्थानचा पुत्र… कॅनडाप्रेमी… सत्यवादी… न्यायासाठी लढणारा… दीन-दलित आणि तळागाळातील पीडित लोकांचा आवाज… तारेक फतेह यांचं निधन झालं आहे. त्यांना ओळखणाऱ्या आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या माध्यमातून त्यांची क्रांती सुरूच राहील. तुम्ही आमच्यात सामील व्हाल का? 1949-2023,” असं नताशा यांनी ट्वीट केलं आहे.

narendra modi marathi news, narendra modi lok sabha marathi news
नरेंद्र मोदी एवढे चिंतातूर का झाले आहेत?
Mumtaz urges on lifting ban on Pakistani artists in India
“आपल्या चित्रपटसृष्टीत प्रतिभावान…”, पाकिस्तान भेटीनंतर बॉलीवूड अभिनेत्रीने केलं तिथल्या कलाकारांचं कौतुक
actress Mumtaz visits Pakistan
Video: भारतीय अभिनेत्री पाकिस्तान दौऱ्यावर, लुटला हाऊस पार्टीचा आनंद; गुलाम अली अन् फवाद खानबरोबरचे फोटो केले शेअर
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”

इस्लाम धर्माची चिकित्सा करणारे आधुनिक विचारांचे लेखक म्हणून फतेह यांची ओळख होती. ते पुरोगामी विचारांसाठी आणि पाकिस्तानबाबतच्या टोकाच्या भूमिकांसाठी ओळखले जात होते. त्यांनी अनेकदा भारतातील भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचं कौतुक केलं होतं.

१९४९ साली पाकिस्तानमध्ये जन्मलेले तारेक फतेह १९८० च्या दशकात कॅनडामध्ये स्थलांतरित झाले. कॅनडामध्ये राजकीय कार्यकर्ते, पत्रकार आणि टेलिव्हिजन निवेदक म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत.