पीटीआय, कराची : Pakistan Hindus conversions देशात हिंदू मुली व महिलांचे सक्तीचे धर्मातर आणि विवाहाच्या धोक्याकडे लक्ष वेधण्यासाठी पाकिस्तानातील अल्पसंख्य हिंदू समाजाच्या अनेक नागरिकांनी निषेध मोर्चा काढला. पाकिस्तानातील हिंदू संघटना पाकिस्तान दरावर इत्तेहाद (पीडीआय) संघटनेतर्फे कराची प्रेस क्लब आणि ‘सिंध असेंब्ली’च्या प्रवेशद्वारापाशी निदर्शने करण्यात आली. निदर्शकांनी सरकारला हिंदू मुली व महिलांच्या सक्तीच्या धर्मातराच्या विरोधात एक रखडलेले विधेयक मंजूर करण्याचे आवाहन केले.

‘पीडीआय’च्या एका सदस्याने सांगितले, की विशेषत: ग्रामीण भागातील सिंधी हिंदू समाजातील १२-१३ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलींचे दिवसाढवळय़ा अपहरण केले जात आहे. त्यांचे बळजबरीने धर्मातर करून, प्रौढ व्यक्तींशी विवाह लावून दिला जात आहे. अलीकडच्या काही महिन्यांत सिंधच्या ग्रामीण भागात अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे आणि पीडित पालकांचे या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या मुली परत आणण्यासाठी कनिष्ठ न्यायालयांत याचिका दाखल झाल्या आहेत.  हे आंदोलन शांततेत पार पडले. पोलिसांनीही कोणताही हस्तक्षेप केला नाही. मात्र दुदैवाने आंदोलकांचे म्हणणे ऐकण्यासाठी व निवेदन स्वीकारण्यासाठी सरकारचा कुणीही प्रतिनिधी आला नाही. त्यामुळे आंदोलकांची व्यथा ऐकून घेणारे कोणीही नव्हते.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Loksatta anvyarth A terrorist attack on Pakistan naval air base in Balochistan province
अन्वयार्थ: अनागोंदीचा आणखी एक पाकिस्तानी पैलू
Islamabad High Court Judges Complaint ISI
‘आयएसआय’चा न्यायालयीन कामकाजामध्ये हस्तक्षेप; इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा गंभीर आरोप

रखडलेले विधेयक

या समस्येबाबत २०१९ मध्ये सिंधच्या ‘असेंब्ली’त चर्चा होऊन अल्पसंख्याक महिलांचे अपहरण, सक्तीचे धर्मातर आणि विवाहाविरुद्धचा ठराव एकमताने मंजूर झाला होता. मात्र, सक्तीचे धर्मातर आणि विवाह हा गुन्हा ठरवणारे हे विधेयक नंतर २०२१ मध्ये ‘असेंब्ली’ने नामंजूर केले. यंदा जानेवारीत संयुक्त राष्ट्रांच्या १२ तज्ज्ञांनी अगदी १३ वर्षे वयापासूनच्या अल्पवयीन मुलींचे अपहरण, सक्तीचे धर्मातर आणि विवाहाच्या प्रकारांत वाढ झाल्याबद्दल इशारा दिला होता.