केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी येथील भाजप कार्यालयावर हल्ला केला. यामध्ये नामफलक व काचा फुटल्या. या वेळी टोमॅटो व अंडीही फेकल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस येण्यापूर्वीच कार्यकर्ते पळून गेले. या प्रकरणी भाजपने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. गिरीराज सिंह यांनी काही दिवसांपुर्वीच सोनिया या कृष्णवर्णीय असत्या तर काँग्रेसजनांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारले असते काय, असे वक्तव्य केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 4th Apr 2015 रोजी प्रकाशित
पुदुच्चेरीत भाजप कार्यालयावर हल्ला
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी येथील भाजप कार्यालयावर हल्ला केला.
First published on: 04-04-2015 at 03:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Puducherry bjp office attacked following giriraj singh comments