शिरोमणी अकाली दलचे (अ) संगरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार सिमरनजीत सिंग मान यांना सोमवारी रात्री जम्मू-काश्मीरमध्ये जाण्यापासून रोखल्याने त्यांनी कठूआ जिल्ह्यातील लखनपूर येथे ठिय्या मांडला आहे. सिमरनजीत सिंग मान यांच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे कारण देत प्रशासनाने त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश नाकारला होता.

हेही वाचा – रेड कॉर्नर नोटीस प्रक्रिया गतिमान करावी ; पंतप्रधान मोदी यांचे ‘इंटरपोल’ला आवाहन

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मान आणि त्यांच्या समर्थकांना जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर मंगळवारची रात्र जम्मू काश्मीर सीमेवरील लखनपूर येथे काढली लागली. यावेळी मान यांच्या समर्थकांकडून जम्मू काश्मीर प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणाही देण्यात आल्या.

हेही वाचा – गुजरात सरकारचे प्रतिज्ञापत्र जडजंबाल, पण तथ्यांचा अभाव ; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

दरम्यान, भाजपाच्या दबावामुळेच मला जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश दिल्या जात नसल्याची प्रतिक्रिया मान यांनी दिली आहे. ”काश्मीरमधून कलम ३७० काढल्यानंतर येथील नागरिकांची काय परिस्थिती आहे, याची माहिती घेण्यासाठी मी काश्मीरमध्ये जाणार होतो. मात्र, मला सीमेवरच रोखण्यात आले, असेही ते म्हणाले.