गेल्या काही वर्षांपासून PUBG या खेळाचं वेड देशातील तरुण पिढीला लागलं आहे. अनेक तरुणांचं मानसिक स्वास्थ्य या खेळापायी बिघडल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. PUBG च्या वेडापायी पंजाबमधील एका मुलाने तब्बल १६ लाख रुपये उडवल्याचं समोर आलंय. PUBG खेळण्यासाठी लागणारं App, cosmetic items, artillery, ऑनलाईन टुर्नामेंटसाठी लागणारे पास, virtual ammunition अशा विविध गोष्टी खरेदी करण्यासाठी या मुलाने वडिलांच्या उपचारासाठी जमवलेले १६ लाख रुपये खर्च केले. The Tribune ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांना आपल्या मुलाच्या या कारनाम्याबद्दल जराशीही कल्पना नव्हती. लॉकडाउन काळात ऑनलाईन अभ्यासाचं कारण देऊन हा मुलगा सतत स्मार्टफोनवर असायचा. वडिलांच्या बँक अकाऊंटचे सर्व डिटेल्स फोनवर सेव्ह असल्यामुळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणं या मुलाला सोपं गेलं. एखादी गोष्टी ऑनलाईन खरेदी केल्यानंतर हा मुलगा बँकेकडून येणारे मेसेज पालकांना समजू नये म्हणून डिलीट करायचा. तसेच पालकांना संशय येऊ नये यासाठी एका खात्यातील रक्कम दुसऱ्या खात्यात आणि दुसऱ्या खात्यातील रक्कम पहिल्या खात्यात असा सोपा मार्ग या मुलाने स्विकारला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे या मुलाने आपल्या आईच्या पीएफ खात्यातले पैसेही PUBG च्या वेडापायी गमावले.

बँकेचं स्टेटमेंट मिळाल्यानंतर पालकांना आपल्या मुलाच्या कारनाम्याविषयी समजलं. आपल्या मुलाने केलेला हा प्रताप समजताच, वडिलांनी मुलाला स्कुटर रिपेअरींगच्या गॅरेजमध्ये काम करायला भाग पाडलं. ” मी आता मुलाला अभ्यास न करता फक्त घरात बसून मोबाईलवर खेळू देणार नाही असं ठरवलंय. पैसे कमावणं किती कठीण असतं हे त्याला समजायला हवं यासाठी मी त्याला गॅरेजमध्ये काम करायला भाग पाडलं आहे. जमवलेला पैसा मी मुलाच्या पुढील भविष्यासाठी वापरणार होतो, त्यामुळे आता काय करायचं हे मला समजत नाहीये”, मुलाच्या वडिलांनी आपली हताश प्रतिक्रीया दिली. त्यामुळे पालकांनी आपली मुलं PUBG च्या नादी लागून कोणतंही चुकीचं काम करत नाही ना याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab teenager spends rs 16 lakh on pubg in game transactions psd
First published on: 04-07-2020 at 13:17 IST