Phone Sex Imran Khan Audio Clip: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे एका नव्या वादामध्ये अडकले आहेत. एका ऑडिओ क्लिपमुळे इम्रान खान अडचणीत आले आहेत. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून या क्लिपमध्ये इम्रान खान एका महिलेबरोबर फोन सेक्स करत असल्याचा आरोप केला जात आहे.

पाकिस्तानमधील पत्रकार सय्यद अली हैदर यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवरुन दोन तुकड्यांमध्ये ही संपूर्ण ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये एक पुरुष महिलेशी अगदी अश्लील भाषेमध्ये गप्पा मारत असल्याचं ऐकू येत आहे. या ऑडिओ क्लिपमधील पुरुषाचा आवाज हा इम्रान खान यांचा असल्याचा दावा केला जात आहे.

व्हायरल झालेली ही ऑडिओ क्लिप ही काही पहिलीच क्लिप नसून इम्रान खान सत्तेमधून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या अशा अनेक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. सध्याचे सरकार आणि लष्कर इम्रान खान यांच्याविरोधात कट करत असल्याचा आरोप त्यांनी स्वत: अनेकदा केला आहे. इम्रान यांच्या पीटीआय या पक्षानेही अनेकदा त्यांच्यावर होणारे आरोप खोढून काढले आहेत. पाकिस्तानमधील बातम्यांच्या काही वेबसाईट्सने दिलेल्या वृत्तानुसार सध्या व्हायरल झालेला फोन सेक्सचा हा ऑडिओ पंतप्रधान कार्यालयामधील आहे.

हा वादग्रस्त ऑडिओ किती खरा आहे याबद्दल साशंकता असली तरी पाकिस्तानमधील काही पत्रकारांनी या ऑडिओमधील आवाज हा इम्रान खान यांचाच असल्याचा दावा केला आहे. “खान साहेबांना त्यांच्या खासगी आयुष्यात जे काही करायचं आहे ते करु शकतात. मात्र मला अपेक्षा आहे की त्यांनी मुस्लीम नेतृत्व म्हणून सर्वांसमोर जाणं थांबवावं,” असं पत्रकार हमाज अझर सलाम यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पत्रकार मन्सूर अली खान यांनी त्यांच्या फेसबुक व्हिडीओ पोस्टमध्ये या व्हायरल ऑडिओमध्ये ज्या महिलेचा आवाज ऐकू येत आहे ती कोण आहे याची आपल्याला माहिती असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भातील वृत्त डेली पाकिस्तान या वेबसाईटने दिलं आहे. पाकिस्तानी पत्रकार निला इनायत यांनी, “या सेक्स कॉल प्रकरणामध्ये इम्रान खान यांचा इम्रान हाश्मी झाला आहे,” असं ट्वीट केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेरीक-ए-इन्साफ म्हणजेच पीटीआय या पक्षाने ही ऑडिओ क्लिप खोटी असल्याचा दावा केला आहे. पीटीआय़चे नेते डॉ. अर्सलान खलिद यांनी, “पीटीआयच्या अध्यक्षांचे राजकीय वैरी असणारे खोटे ऑडिओ आणि व्हिडीओ बनवण्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करु शकत नाही,” असा टोला लगावला आहे.