पीटीआय, नवी दिल्ली

भारताच्या दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये आपल्या देशाचा संपूर्ण पाठिंबा आहे असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले. पुतिन आणि मोदी यांच्यादरम्यान सोमवारी दूरध्वनीवरून चर्चा झाली. त्या वेळी पहलगाम हल्ल्यातील दोषींना शिक्षा झालीच पाहिजे असे पुतिन या संभाषणादरम्यान म्हणाले.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट लिहून यासंबंधी माहिती दिली. हल्ल्यात बळी गेलेल्यांबद्दल पुतिन यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. पुतिन यांनी पहलाग हल्ल्याचे वर्णन रानटी असे केले आणि दोन्ही नेत्यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात कोणत्याही तडजोडीविना लढा देण्याची गरज ठळकपणे मांडली, असे रशियाच्या भारतातील दूतावासाकडून सांगण्यात आले.

भारताच्या आमंत्रणाचा स्वीकार

पंतप्रधान मोदी यांनी ‘व्हिक्टरी डे’च्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त पुतिन यांना शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांना या वर्षी भारतामध्ये होणाऱ्या वार्षिक भारत-रशिया शिखर परिषदेचे आमंत्रण दिले, ते पुतिन यांनी स्वीकारले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालय आणि रशियाच्या दूतावासाने दिली.

चीनचा पाकिस्तानला पाठिंबा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्लामाबाद : दक्षिण आशियामध्ये शांतता आणि स्थैर्यासाठी चीन नेहमीच पाकिस्तानला पाठिंबा देईल असे चीनचे पाकिस्तानातील राजदूत जियांग झायडाँग यांनी सोमवारी सांगितले. झायडाँग यांनी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. तर झरदारी यांनी भारताने केलेल्या उपाययोजनांबद्दल चिंता व्यक्त केली.